Category Archives: Inspirational SMS

We present you collection of Marathi Inspirational SMS. Top Marathi Inspirational messages and inspirational quotes from top authors in Marathi Language.

कष्ट करा पोटभर मिळेल

कष्ट करा पोटभर मिळेल
विश्वास करा प्रेम मिळेल
सेवा करा सुख मिळेल
मदत करा फळ मिळेल
कल्पना करा मार्ग मिळेल
दोस्ती करा साथ मिळेल
दान करा धन मिळेल
आदर करा सन्मान मिळेल
सत्कार करा संस्कार मिळेल.
जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा,
कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल…..

यश आणि सुख

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.

उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.

यश आणि सुख जोडीने येतात.

आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश

आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

“समाधान” म्हणजे

“समाधान” म्हणजे
एक प्रकारचे “वैभव” असून,
ते अंत:करणाची “संपत्ती” आहे.
ज्याला ही “संपत्ती” सापडते
तो खरा “सुखी” होतो.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

एकदा वेळ निघून गेली की

एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..
पण
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…

आयुष्याची मजा

आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत
तर दुरावा वाढतो, अंतर वाढते..
यात चूक त्याची पण नसते,
आणि तिची पण नसते,
चूक वेळेची असते…..
यावर एकाच उपाय आहे,
त्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि,
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या
शंभर क्षणावर भारी पडतील
जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका…
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते…

चांगल्या कल्पना

तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडे हि एक रुपया आहे,
आपण अदला बदल केली तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील…

पण

तुमच्याकडे एखादी चांगली कल्पना आहे आणि माझ्याकडेही एखादी चांगली कल्पना आहे ,
आपण अदला बदल केली तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगल्या कल्पना होतील ……

वारंवार अपयश मिळत असेल तर

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर
याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.