Category Archives: Marathi Jokes

Marathi Jokes, Marathi Humor

अजब प्रेम की गजब कहानी

डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात.
एक दिवस ते दोघेजण रंगात येतात,
आणि एकमेकांच चुंबन घेतात.
.
.
दुसरया दिवशी डुक्कर मरते, “बर्ड फ्लू” मुळे.
.
.
आणि
.
.
.
.
कोबडी मरते “स्वाइन् फ्लू” मुळे.
यालाच म्हणतात “अजब प्रेम की गजब कहानी”

सर्वात लहान लव्ह स्टोरी

जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी,
पुणेरी मुलगा अन् कोल्हापूरी मुलगी…
मुलगा- अग मला तुझ्याशी थोड बोलायचे आहे…
मुलगी- बोल की भावा.
खेळ खल्लास

आठवण

प्रियकर – प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटो कडे बघत राहतो….
.
प्रियसी – आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर..?
.
.
.
.
प्रियकर – मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो….

जीवापाड प्रेम

मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले….

काय झालं?

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा.

बायको हरवलीय….

एक पती : अहो माझी बायको हरवलीय….
दुकानदार : त्याचा इथे काय संबंध….
हे एक मेडिकल स्टोअर आहे…
तुम्ही पोलिस स्टेशन ला जा….
पती : ओह माफ करा….आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….

ता . क. हा विनोद आहे… जास्त मनावर घेऊ नये