Category Archives: Husband Wife Jokes

Marathi Husband Wife Jokes

काय झालं?

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा.

बायको हरवलीय….

एक पती : अहो माझी बायको हरवलीय….
दुकानदार : त्याचा इथे काय संबंध….
हे एक मेडिकल स्टोअर आहे…
तुम्ही पोलिस स्टेशन ला जा….
पती : ओह माफ करा….आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….

ता . क. हा विनोद आहे… जास्त मनावर घेऊ नये

गाण्याचा कार्यक्रम

गणपतराव : काय हो , वसंतराव तुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली ?
वसंतराव : कारागृहामध्ये तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना .
गणपतराव : असं होय , सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक करायची ठरवलीयं तर !