Category Archives: Marathi Quotes SMS

Marathi Quotes SMS

कोणत्याही अपेक्षेशिवाय

कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!
कारण एक जुनी म्हण आहे “जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.

!! शुभ प्रभात !!

वारंवार अपयश मिळत असेल तर

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर
याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

जीवनाच्या हिंदोळ्यावर

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं….

– अनामिक

आयुष्याची ङायरी लिहणारा

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..

जे आपल्याला हवं असतं

जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं.