Category Archives: Miss You

हळुवार जपून ठेवलेले क्षण

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…

Haluva Japun thevlele kshan,
tech majhya jagnyachi aas aahe….
ekek sathvun thevleli aathvan,
tich majhyasathi khaas aahe….

कोणी कोणाच्या आयुष्यात

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…

फक्त आठवणी

अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी

तू आहेस….

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत….
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे….
आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच
तू आहेस….

तुझ्या सहवासात…

तुझ्या सहवासात…
रात्र जणू एक गीत धुंद…

प्रीतीचा वारा वाहे मंद…
रातराणीचा सुगंध..

हरवावे वाटते तुझ्या कुशीत…
करून पापण्यांची कवाडे बंद…

शुभ रात्री …