कष्ट करा पोटभर मिळेल

कष्ट करा पोटभर मिळेल
विश्वास करा प्रेम मिळेल
सेवा करा सुख मिळेल
मदत करा फळ मिळेल
कल्पना करा मार्ग मिळेल
दोस्ती करा साथ मिळेल
दान करा धन मिळेल
आदर करा सन्मान मिळेल
सत्कार करा संस्कार मिळेल.
जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा,
कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल…..

यश आणि सुख

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.

उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.

यश आणि सुख जोडीने येतात.

आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश

आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

“समाधान” म्हणजे

“समाधान” म्हणजे
एक प्रकारचे “वैभव” असून,
ते अंत:करणाची “संपत्ती” आहे.
ज्याला ही “संपत्ती” सापडते
तो खरा “सुखी” होतो.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

एकदा वेळ निघून गेली की

एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..
पण
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…

बोलता बोलता

बोलता बोलता काही जण रुसुन जातात….
चालता चालता हातातले हात सुटून जातात….
म्हणतात कि मैत्रीची गा
खूप नाजूक असते….
इथे तर हसता हसता काहीजण
विसरुन जातात……..

चंद्राला पाठवलंय

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी….

शुभ रात्री

कळी सारखे उमलुन

कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आश्रु असो कोणाचेही
आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे …
!! शुभ रात्री !!