Tag Archives: Miss You

कोणी कोणाच्या आयुष्यात

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…

फक्त आठवणी

अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी

तुझ्या सहवासात…

तुझ्या सहवासात…
रात्र जणू एक गीत धुंद…

प्रीतीचा वारा वाहे मंद…
रातराणीचा सुगंध..

हरवावे वाटते तुझ्या कुशीत…
करून पापण्यांची कवाडे बंद…

शुभ रात्री …